अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती चिंताजनक : शंभरामागे होत आहेत इतके कोरोना पॉझिटिव्ह…

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 4 मे 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यात कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत असून जिल्ह्यात रोज चार हजारांपेक्षा अधिक कोरोनाबाधित आढळून येत आहेत.

जिल्ह्यातील सरकारी आणि खासगी रुग्णालयात आयसीयु, ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर बेड मिळणे कठीण झाले आहे.

कोरोना रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांचे खूप हाल होत असून अनेक रुग्णांना आपल्या प्राणास मुकावे लागत आहे

कोरोना बाधितांच्या टक्केवारीत नगर जिल्ह्यातील संख्येने राज्याला मागे टाकले आहे. राज्याचा पॉझिटिव्हीटी रेट 17 असून नगर मात्र 25 टक्क्यांपेक्षा पुढे गेले आहे.

मृत्यूचे प्रमाण महाराष्ट्रात 1.5 असून नगरचे प्रमाण मात्र 1.13 इतके आहे. सरत्या एप्रिल महिन्यांत जिल्ह्यातील 80 हजार जणांना करोनाची बाधा झाली तर 691 जणांचा बळी घेतला आहे.

नगरमध्ये शंभरामागे 25 जणांची करोनाची टेस्ट पॉझिटिव्ह येत असल्याने हॉस्पिटल फुल्लं झाली आहेत.राज्याचा रिकव्हरी रेट 84.06 असून नगरचा 85.66 इतका आहे.

मार्च 2020 मध्ये करोनाची नगरमध्ये एन्ट्री झाली. त्या महिन्यांत केवळ 8 बाधित होते. एप्रिलमध्ये 34 बाधित निघाले. त्यानंतर बाधितांची संख्या महिन्यांगणिक तीन आकड्यात पोहचली.

मार्चमध्ये 19 हजार 41 नव्या बाधितांची भर पडली. एप्रिलमध्ये बाधितांच्या आकड्याने रेकॉर्ड केले. जिल्ह्यातील तब्बल 80 हजार 118 जणांना करोनाची बाधा झाली आहे.

जिल्ह्यात आजपर्यंत 2 हजार 71 जणांचा करोनाने मृत्यू झाला. त्यातील 691 मृत्यू हे केवळ एप्रिल महिन्यांतील आहेत.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe