अहमदनगर Live24 टीम, 4 मे 2021 :-केंद्राचे सूचना प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांचे स्वीय सहायक अनंत तांबे (वय ३२, रा.राहुरी) यांचा सोमवारी (दि.३) सकाळी साडेदहा वाजता औरंगाबाद येथील एका खाजगी रुग्णालयात कोरोनावर उपचार सुरू असताना मृत्यू झाला.
अनंत तांबे यांच्या नातेवाइकांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांची सासरवाडी औरंगाबाद येथील असून ते पत्नीला सोडण्यासाठी सासरवाडीत आले होते. मात्र त्यांना अंगात ताप आल्यासारखे वाटल्याने त्यांनी आपली आरटीपीसीआर चाचणी केली होती.
अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एका नातेवाईक डॉक्टरांच्या मदतीने तांबे यांना जालना रोडवरील कृष्ण रुग्णालयाच्या कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते. पाच दिवसांपूर्वी त्यांचा स्कोर हा १९ पर्यंत पोहोचल्याने त्यांना अतिउच्च दाबाच्या व्हेंटिलेटरने ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात येत होता.
सोमवारी सकाळी तांबे यांची कोरोनाशी अखेरची झुंज संपली. १६ दिवसांपासून ते या रुग्णालयात उपचार घेत होते. आयआर एस दर्जाचे अधिकारी असलेल्या आनंद तांबे यांच्या निधनाने प्रशासकीय दलासह राजकीय वर्तुळात शोक व्यक्त करण्यात येत आहे.
तांबे हे यापूर्वी तत्कालीन केंद्रीय मंत्री अरविंद सावंत यांचे देखील स्वीय सहायक म्हणून कार्यरत होते त्यांच्या या आकस्मिक मृत्यूबद्दल केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, माजी केंद्रीय मंत्री अरविंद सावंत यांनी समाजमाध्यमांवर शोक व्यक्त केला आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|