कोरोनाला डावलून ऊसतोड मजूर पोहचले आपल्या गावी

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 5 मे 2021 :-जिल्ह्यात कोरोनाने हाहाकार केला आहे. दरदिवशी विक्रमी रुग्णसंख्या आढळून येत आहे. यातच सर्वत्र प्रादुर्भाव झालेल्या कोरोनाला ऊसतोड मजुरांनी जवळही फिरू दिले नाही.

विनाकारण न फिरता आणि रोजचा कामधंदा चालू ठेवून त्यांनी हे करून दाखवले. विशेषबाब म्हणजे कोरोनालाही जवळही फिरकू न देता हे मजूर आपापल्या गावी पोहचले आहे.

दरम्यान हा प्रकार जिल्ह्यातील अगस्ति सहकारी साखर कारखान्यांतर्गत काम करणारे ऊसतोड मजुरांबाबत आढळून आला आहे. जिल्ह्यांतून सुमारे 8 हजार मजूर अकोले तालुक्यात आले होते.

गेल्या सहा महिन्यात एकही कामगार अथवा मुलाबाळांना कोरोनाची लागण झाली नाही. अगस्ति कारखान्याने आमची काळजी घेत मुक्कामाच्या ठिकाणी असलेल्या झोपड्यांमध्ये थेट किराणा व भाजीपाला पाठविला असल्याची प्रतिक्रिया ऊसतोड मजूर पवार यांनी दिली.

यासाठी कुठेही बाजारात जाण्याची गरज पडली नसल्याचे मजुरांनी सांगितले. विनाकारण न फिरता आणि रोजचा कामधंदा चालू ठेवूनही कोरोनाला जवळ फिरकू न दिल्याचा वस्तुपाठ अगस्ति कारखान्याच्या माध्यमातून ऊसतोड मजुरांनी घालून दिला आहे.

हंगाम यशस्वीरित्या पूर्ण करुन मजूर आपल्या मायदेशी परतले आहे. यातून इतर नागरिकांनी धडा घ्यावा आणि कोरोनाचे समूळ उच्चाटन करावे हीच अपेक्षा.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe