अहमदनगर ब्रेकिंग : खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांच्‍या विरोधात गुन्‍हा दाखल करण्‍यास नकार !

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 5 मे 2021 :-रेमडेसिवीर इंजेक्‍शन प्रकरणात खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांच्‍या विरोधात गुन्‍हा दाखल करण्‍यास उच्च नकार देत, विरोधकांनी दाखल केलेली याचिका निकाली काढली.

विमानातून आणलेल्‍या रेमडेसिवीर इंजेक्‍शनचा व्हिडीओ प्रसारीत केल्‍याच्‍या कारणाने खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांच्‍या विरोधात राजकीय हेतूने औरंगाबाद खंडपीठात याचीका दाखल करण्‍यात आली होती.

या याचीकेची सुनावणी न्‍या.आर.व्‍ही.घुगे आणि न्‍या.बी.यु.देबडवार यांच्‍या खंडपीठापुढे सुनावणी सुरू होती.कोव्हीड संकटाच्या पार्श्वभूमीवर खा.डॉ सुजय विखे पाटील यांनी आणलेल्या रेमडीसिव्हर इंजक्शनच्या संदर्भात या याचिकेतून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती.

मात्र खा.डॉ विखे यांच्या वतीने खंडपीठात बाजू मांडताना आणलेल्या सर्व इंजक्शनची अधिकृतता आणि शासन स्तरावरची असलेली परवानगी न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आली होती.

खा.विखे पाटील यांच्या वतीने सादर करण्यात आलेल्या सर्व कागदपत्रांची सत्यता आणि गृह विभागाने दिलेल्या अहवाला नंतर ही याचीका निकाली काढताना खंडपीठाने स्‍पष्‍ट केले की, खा. डॉ.सुजय विखे पाटील यांचेवर गुन्‍हा दाखल करावा असे कोणतेही निष्‍कर्ष या या‍चिकेत नाही.

त्यामुळे गुन्हा दाखल करण्यास नकार देतानाच,पोलीस निरीक्षक यांनी कायद्याच्या चौकटीत चौकशी करावी असे आदेश दिले.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News