जिल्हा परिषदेकडून कोपरगावला १७ लाखांचा निधी

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 7 मे 2021 :- आमदार आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाकडून कोपरगाव तालुक्याला १७ लाख ३० हजार रुपये निधी मंजूर झाला असल्याची माहिती जिल्हा परिषद सदस्या सोनाली साबळे यांनी दिली.

याबाबत पत्रकात साबळे यांनी सांगितले, की आ. काळे यांच्या प्रयत्नातून समाज कल्याण विभागाच्या २० टक्के सेस फंडातून २०२०/२१ या आर्थिक वर्षात अनुसूचित जाती- जमाती व इतर मागास प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी २३ कडबा कुट्टी मशीन, १४ इले्ट्रिरक मोटार,

३४ शिलाई मशीन यासाठी ९ लाख ८१ हजार तसेच ५ टक्के सेस फंडातून अपंग लाभार्थ्यांसाठी १४ दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी पिठाच्या गिरणीसाठी प्रत्येकी १३ हजार रुपये, लघु उद्योगासाठी ८ व्यक्तींना प्रोत्साहनपर अनुदान प्रत्येकी १६ हजार,

औषधोपचारासाठी ११ व्यक्तींना प्रत्येकी २० हजार व बहु विकलांग ८ व्यक्तींच्या पालकांना प्रत्येकी २० हजार रुपये अर्थसहाय्य असे एकूण १७ लाख ३० हजार रुपये निधी मंजूर झाला असल्याचे साबळे यांनी सांगितले.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe