मुख्याधिकाऱ्यांची बदली रद्द करा; अन्यथा आत्मदहन करणार

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 7 मे 2021 :- सध्या जिल्ह्यात अनेक खात्यांमध्ये बदल्यांचे सत्र सुरु झाले आहे. काही वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर सरकारी अधिकार्यांची बदली केली जाते.

त्यानुसार कोपरगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांचा तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होत असल्याने शासन नियमाप्रमाणे त्यांची बदली होणार आहे.

मात्र कर्तव्यनिष्ठ असे अधिकारी म्हणून ओळख निर्माण करणारे सरोदे यांना मुदतवाढ देऊन त्यांची बदली रद्द करावी,

अशा मागणीचे निवेदन कोपरगाव महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने नगराध्यक्ष विजय वहाडणे यांना देण्यात आले आहे. यावेळी नगराध्यक्ष विजय वहाडणे म्हणाले की,

हीच मागणी मी यापूर्वी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याकडे केली आहे. किमान अजून एक वर्ष कोपरगावच्या विकासासाठी प्रशांत सरोदे यांची बदली करू नका,

अशी विनंती केली आहे. बदली रद्द केली नाही तर तहसील कार्यालयाजवळ आत्मदहन करण्यात येईल, असा इशाराही मनसेने दिला आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe