घरात घुसून चोरटयांनी सोन्या – चांदीचे दागिने केले लंपास

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 7 मे 2021 :- कोरोनाचा काळ सुरु असल्याने पोलीस प्रशासन लॉकडाऊन आणि कडक नियोजनामध्ये व्यस्त असल्याचा कायदा घेऊन जिल्ह्यात पुन्हा एकदा चोरटे सक्रिय झाले आहे.

यामुळे जिल्ह्यात दरदिवशी चोऱ्यांचे प्रमाणात वाढ होताना दिसून येत आहे. नुकतेच जिल्ह्यात कर्जत तालुक्यातील माही जळगाव येथे मध्य वस्तीमध्ये राहणाऱ्या मीना सर्जेराव महारनवर यांच्या घरावर चोरटयांनी डाव साधला आहे.

महारनवर यांच्या घरी तीन अज्ञात चोरट्यांनी धमकावून एक लाख ३६ हजार रुपयांची सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले. दरम्यान या प्रकाराने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

तीन अज्ञात चोरट्या विरोधात पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिली आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News