बूथ हॉस्पिटला १ कोटी ९० लाखाचा धनादेश !

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 7 मे 2021 :- मागील वर्षी कोरोना संकट काळामध्ये जिल्ह्यातील प्रथम रुग्णापासून बूथ हॉस्पिटलने कोरोना रुग्णांनावर मोफत उपचार सुरू केले होते आज पर्यत हजारो रुग्ण बरे होऊन आनंदाने घरी गेले आहेत.

बूथ हॉस्पिटलने आपल्या आरोग्य सेवेतून नगर जिल्ह्यातील जनतेचा विश्वास संपादन केला आहे. कोरोना काळात केलेल्या सेवेचा राज्यभर बूथ हॉस्पिटलचे नाव लौकिक झाले आहे.

कोरोना आजार हा नवीन असतांना नगर जिल्ह्यातील कोणतेही हॉस्पिटल कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी पुढे आले नव्हते मात्र बूथ हॉस्पिटलने कुठलाही विचार न करता कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू केले.

कोरोना बाबत नागरिकांच्या मनात मोठी भीती निर्माण झाली होती तरीसुद्धा बूथ हॉस्पिटल मधील डॉक्टर, नर्स,आरोग्य सेविका,प्रशासन यांच्या धैर्याचे कौतुक केले पाहिजे त्यांनी मागील वर्षी केलेल्या आरोग्य सेवे बद्दल महापालिकेच्या माध्यमातून 1 कोटी 90 लाख रुपयांचा धनादेश बूथ हॉस्पिटला सुपूर्त केला असल्याचे प्रतिपादन आ. संग्राम जगताप यांनी केले.

मागील वर्षी कोरोने संकट काळात बूथ हॉस्पिटलने कोरोना रुग्णांना मोफत आरोग्यासेवा दिल्या बद्दल महापालिकेच्यावतीने 1 कोटी 90 लाख रुपयांचा धनादेश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या हस्ते बूथ हॉस्पिटलचे प्रशासकीय अधिकारी मेजर देवदान कळकुंबे यांच्याकडे सुपूर्त केला यावेळी आ.संग्राम जगताप,आयुक्त शंकर गोरे,

उपायुक्त यशवंत डांगे, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निश्चित, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुनील पोखरणा, मनपा आरोग्य अधिकारी डॉ.अनिल बोरगे,अनिल लोंढे तसेच आधी उपस्थित होते. यावेळी बोलताना आयुक्त शंकर गोरे म्हणले की,

जिल्हा नियोजन समितीमधून महापालिकेला 5 कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला होता त्यामधून बूथ हॉस्पिटलच्या मागील वर्षी केलेल्या आरोग्यसेवेचे 1 कोटी 90 लाख रुपयाचा धनादेश आज जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सुपूर्त केला आहे. यावेळी बूथ हॉस्पिटलचे प्रशासकीय मेजर देवदान कळकुंबे यांनी सर्वांचे आभार मानले.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News