अहमदनगर Live24 टीम, 8 मे 2021 :-ष्ठ कृषीतज्ज्ञ, भूमाता संघटनेचे प्रमुख डॉ. बुधाजीराव मुळीक यांनी मराठा आरक्षण रद्द झाल्याबाबत ठाकरे सरकारवर नाराजी व्यक्त केली आहे.
आता मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते आणि राज्यातील सर्वपक्षीय खासदारांनी दिल्लीवर दबाव आणून मराठा समाजाला आरक्षण मिळवून द्यावे अशी मागणी त्यांनी केली आहे.
ते पुढे म्हणाले की, ‘आता तरी राज्य सरकारने शहाणे होऊन मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा,
तोपर्यंत सूपर न्यूमररीच्या आधारे शिक्षण व नोकऱ्यांमध्ये मराठा समाजाला जागा द्याव्यात, तसेच शेतमालाला योग्य बाजारभाव देणारा कायदा राज्य सरकारने करावा’ अशा मागण्याही त्यांनी केल्या.
मराठा समाज सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास असल्याबाबत राज्य मागासवर्गीय आयोगाच्या अहवालातील मुद्दे सर्वोच्च न्यायालयापुढे मांडण्यात राज्य सरकार कमी पडले’
अशा डॉ. बुधाजीराव मुळीक यांनी ठाकरे सरकारवर नाराजी व्यक्त केली आहे. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत डॉ. मुळीक यांनी खंत व्यक्त केली.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|