वाढदिवस ! पडद्याआड असणाऱ्या डाॅ हर्षल तांबेचा !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 9 मे 2021 :-शैक्षणिक, वैद्यकीय, संस्कृतिक,सामाजिक, राजकीय, अशा प्रत्येक क्षेत्रात स्वत: उभे राहुन निर्भेळ काम करणारे, पण जाहीर कार्यक्रम, वाढदिवस आणि कौतुक सोहळ्यांपासून दूर असलेल्या डाॅ. हर्षल तांबे यांचा आज वाढदिवस! प्रसिद्धीच्या झोतापासून डाॅ. हर्षल तांबे कायम दुर राहतात.

प्रसिद्धी हा शब्द त्यांना कधीच आवडत नाही. अतिशय कमी वयात त्यांनी आपल्या कामाची छाप समाजमनावर पाडली आहे. जिगर, ध्यास, चिकाटी, उत्साह, आत्मविश्वास अशी सर्व गुणवैशिष्ट्ये डाॅ. हर्षल तांबे यांच्यामध्ये आहेत.

महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांच्या प्रत्येक सामाजिक, राजकीय कामात डाॅ. हर्षल मदत करत असतात व बारकाईने काळजी पण घेत असतात. प्रसिद्धीपासून दूर राहून प्रत्येक जबाबदारी, नियोजन अगदी योग्य रितीने यशस्वीपणे ते पार पाडत असतात.

डाॅ. हर्षल तांबे यांच्या प्रचंड मेहनत आणि प्रामाणिक प्रयत्न व शिस्तबद्ध वाटचालीमुळे एसएमबीटीने उत्तर महाराष्ट्राच्या आरोग्यसेवेत मानाचा तुरा रोवला आहे. समाजातील वंचित आणि गरजु घटकांसाठी एसएमबीटी ही महाराष्ट्रभर आरोग्याची गुरूकिल्ली बनली आहे.

एसएमबीटीतील वरिष्ठ अधिकारी ते शेवटच्या शिपाया पर्यंत एकमेकात बंधुभावाचे नाते निर्माण केले आहे. प्रत्येकाला आपल्या कुटुंबातील सदस्याप्रमाणे ते वागणूक देतात.

मॅनजमेंट गुरू, बुद्धीबळाच्या पटावरील राजा, मिस्टर परफेक्शनिस्ट अशा सुवर्ण अक्षराने त्यांना संगमनेरकर कायम संबोधित असतात. असे माझे मार्गदर्शक असणाऱ्या डाॅ. हर्षल तांबे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe