अहमदनगर Live24 टीम, 10 मे 2021 :- अहमदनगर शहरात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असल्याने अहमदनगर शहरात १० मे पर्यंत कडक लॉकडाऊन (ahmednagar lockdown) करण्यात आला होता मात्र आता तो आणखी वाढविला आहे.
अहमदनगर शहरातील लॉकडाऊन 15 मे पर्यंत वाढविण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला असल्याने अहमदनगर शहरातील नागरिकांना 15 मे पर्यंत तरी घरातच बसावे लागणार आहे.
त्यासंदर्भात आज सायंकाळी आदेश काढले जाणार असल्याची माहिती उपायुक्त प्रदीप पठारे यांनी दिली. नगर शहरात कोरोनाचा सुरू असलेला उद्रेक पाहता
महापालिका आयुक्त शंकर गोरे यांनी 3 ते 10 मे या कालावधीत हॉस्पिटल, मेडिकल आणि दूध विक्री (सकाळी 7 ते 11) याच्याशिवाय सर्व अस्थापना बंदचा आदेश काढला होता.
आज सोमवारी रात्री हा आदेश संपुष्टात येणार होता. त्यापूर्वी आज आयुक्त शंकर गोरे, महापौर बाबासाहेब वाकळे, उपायुक्त प्रदीप पठारे यांची बैठक झाली होती.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|