पोटासाठी दशक्रियाविधी प्रसंगी मुंडण करण्यासाठी गेलेल्या युवकाचा कोरोनाने बळी घेतला !

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 10 मे 2021 :-वर्ष दीड वर्षापासून अनेक अडचणींचा सामना करत व्यवसायाच्या माध्यमातून कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू होता. बंदी असली तरी, जनसंपर्कातून तो दोन पैसे मिळून घर चालवण्याचा प्रयत्न करीत होता.

कोरोना आजार जीवघेणा असल्याची त्याला देखील जाणीव होती. परंतु, कुटुंबियांचा उदरनिर्वाहासाठी तो धोका पत्कारून दशक्रिया विधी प्रसंगी मुंडण करण्यासाठी गेलेल्या युवकाचा कोरोनाने बळी घेतला.

ही घअना कोपरगावात घडली. तो तरूण वयोवृद्ध आई-वडील, पत्नी, मुलगा, मुलगी, मयत झालेल्या भावाची पत्नी, मुलीचा सांभाळ करत होता.

पंधरा-वीस दिवसापूर्वी दशक्रियाविधी कार्यक्रमात मुंडण करण्यासाठी तो गेला होता. या कार्यक्रमात त्याला कोरोनाची बाधा झाली.

आजाराची लक्षणे दिसायला लागल्यानंतर त्याला दवाखान्यात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना त्याचे निधन झाले.

मागील वर्षीही लॉकडाऊन असल्यामुळे सलून व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले. नाभिक समाजाचा उदरनिर्वाह व्यावसायावर अवलंबून असल्याने लॉकडाऊन काळात शासनाकडून मदत मिळणे अपेक्षित होते.

मात्र, शासनाकडून मदत मिळाली नसल्याने व्यावसायिकांचे हाल झाले. चालू वर्षीदेखील एप्रिल महिन्यापासून राज्यात लॉकडाऊन लागल्याने सलून व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News