अहमदनगर Live24 टीम, 11 मे 2021 :-जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता लसीकरण मोहीम मोठ्या प्रमाणावर सुरु करण्यात आली आहे. मात्र जिल्ह्यात सातत्याने लसीचा तुटवडा जाणवतो आहे.
यामुळे आता नागरिकांचा संताप अनावर झाला आहे. कोरोना लसीकरणासाठी ऑनलाइन नोंदणीमुळे शेवगाव तालुक्यातील स्थानिक नागरिकांना बाहेरच्या जिल्ह्यातून व तालुक्यातून आलेल्या नागरिकांमुळे लस मिळत नसल्याने संतप्त झालेल्या शहरातील युवकांनी आज शेवगाव येथील ग्रामीण रुग्णालयात होणारे लसीकरण तीन ते चार तास बंद पाडले.

यामध्ये सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी प्रथम स्थानिक नागरिकांना लस द्या, मगच बाहेरुन आलेल्या इतर नागरिकांना लस द्यावी, असे म्हणत रुग्णालयाच्या दारातच ठिय्या मांडला.
यामुळे काही काळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. १८ ते ४५ वयोगटातील नागरिकांची ऑनलाइन नोंदणी करुन ठरवून दिलेल्या केंद्रावर लसीकरणासाठी वेळ दिली जाते.
लसीच्या उपलब्धतेनुसार बाहेरच्या जिल्ह्यातील व तालुक्यातील व्यक्ती नोंदणी करत असल्याने तालुक्यातील नागरिकांना संधी मिळत नाही.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|













