कोरोना विरुद्धच्या लढ्यात नगर जिल्ह्याला 10 कोटी 81 लाख 85 हजार रुपयांचा निधी !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 11 मे 2021 :-करोना संसर्गाला प्रतिबंध करण्यासाठी विविध उपाययोजनांच्या दृष्टीने राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून प्रथम हप्ता म्हणून सर्व विभागीय आयुक्तांना 176 कोटी 29 लाख 5 हजार रुपयांचा निधी अनेक जिल्ह्यांना वितरीत करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

यात नगर जिल्ह्याच्या वाट्याला 10 कोटी 81 लाख 85 हजार रुपयांचा निधी आला आहे. केंद्र सरकारने ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांना मोठी आर्थिक रसद पाठवली आहे.

कोरोनासंबधी उपाययोजना आणि पीडितांना दिलास देण्यासाठी केंद्र सरकारने 25 राज्यांमधील स्थानिक स्वराज्य संस्थांना तब्बल 8,923 कोटी रुपयांची मदत देऊ केली आहे.

यापैकी 861 कोटी रुपयांचा निधी महाराष्ट्राच्या वाट्याला आला आहे. आर्थिक निधीतून या गोष्टी खरेदी करता येणार या निधीतून आरटीपीसीआर किट्स आणि व्हीटीएम किट्स न्यूनतम दराने खरेदी करता येणार आहे.

तसेच औषधे घेता येणार आहेत. शासकीय, नगरपालिका, मनपा यांच्यासाठी लिक्वीड 02 टँक, ऑक्सिजन सिंलेडर, वैद्यकीय उपकरणे, साहित्य सामुग्री खरेदी करता येणार आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe