अहमदनगर Live24 टीम, 12 मे 2021 :- तालुक्यातील वाकडी शिवारात शेतात गवत आणण्यासाठी गेलेल्या महिलेचा विनयभंगकेल्याप्रकरणी एका जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाकडी शिवारातील एक महीला शेतात गवत आणण्यासाठी गेली होती. त्यावेळी संतोष सावळेराम शेंडे(रा.मुकिंदपूर,ता. नेवासा) याने सदर महिलेच्या केसाला धरून खाली पाडुन लाथाबुक्क्यांनी मारहाण करून लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले.
याचवेळी पीडित महिलेचा पती तिला वाचवण्यासाठी मध्ये आला असता त्याला देखील संतोषने लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली.
याबाबतच्या तक्रारीवरुन नेवासा पोलीस ठाण्यात 309 /2021 भादवि कलम 354 ,323, 504 ,506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास नेवासा पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक देवकाते हे करीत आहेत.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|