विडी कामगारांना दोन हजार रुपये अनुदान देण्याची मागणी

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 13 मे 2021 :- टाळेबंदीत उदरनिर्वाहासाठी शहरातील विडी कामगारांना दोन हजार रुपये अनुदान त्वरीत त्यांच्या खात्यावर मिळण्यासाठी लालबावटा विडी कामगार युनियनतर्फे (आयटक) जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवेदन देण्यात आले.

अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. यावेळी सल्लागार अ‍ॅड.कॉ. सुभाष लांडे, जिल्हा सचिव अ‍ॅड.कॉ. भारती न्यालपेल्ली, उपाध्यक्ष कॉ. भारती न्यालपेल्ली, संगीता कोंडा, शोभा बिमन, शारदा बोगा, सुमित्रा जिंदम आदी उपस्थित होते.

टाळेबंदी काळात एमआयडीसी सुरू आहे. तेथील कामगारांना पगार मिळत आहे. सरकारी कर्मचार्‍यांनाही पगार सुरू आहे. रिक्षाचालक, बांधकाम कामगार, मोलमजूर यांना राज्य सरकारने दीड हजार रुपये अनुदान देण्याचे जाहीर केले.

विडी कामगारांना एक महिना झाला असून, त्यांचे हातावर असलेले विडी वळण्याचे काम बंद आहे. विडी कारखान्यांना आगाऊ रक्कम मागणी करुनही देण्यात आलेली नाही.

विडी कामगार दारिद्रयरेषेखाली असून गरीब आहेत. टाळेबंदीत सर्व काम बंद असल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe