मोदींनी प्रचारसभा घेऊन स्वत: करोना पसरवला आणि आता रडतायत !

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 22 मे 2021 :-    कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहा:कार माजवलेला असतानाच तिसऱ्या लाटेचं संकटही घोंघावू लागलं आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या वाराणासी मतदारसंघातील डॉक्टरांशी संवाद साधला.

यावेळी मोदी अत्यंत भावूक झाले होते. तिसऱ्या लाट भयंकर आहे. आम आदमी पार्टीचे राज्य सभेचे खासदार संजय सिंह यांनी शुक्रवारी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल केलेली भविष्यवाणी खरी ठरल्याचा दावा केलाय.

सिंग यांनी मागील महिन्यामध्येच पंतप्रधान मोदी देशातील करोना परिस्थितीसंदर्भात बोलताना टीव्हीवर येऊन रडतील, असं म्हटलं होतं. शुक्रवारी पंतप्रधान मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून डॉक्टरांशी संवाद साधला.

यावेळी मोदींचा कंठ दाटून आल्याचं पहायला मिळालं. मोदींना आलेला हा गहिवर सध्या इंटरनेटवर चर्चेचा विषय ठरत आहे.

आम आदमी पार्टीने जारी केलेल्या अधिकृत पत्रकामध्ये संजय सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल व्यक्त केलेली शक्यता खरी ठरली आहे. राज्यसभेतील आपचे खासदार असणाऱ्या संजय यांनी १७ एप्रिलच्या एका मुलाखतीमध्ये व्यक्त केलेलं भाकित २१ मे रोजी खरं ठरलं, असं आपने म्हटलं आहे.

याच मुलाखतीमधील काही भाग शेअर करत संजय यांनी मोदींवर शुक्रवारी ट्विटरवरुन निशाणा साधला. “जे १७ एप्रिलला बोललो होतो ते २१ मे ला खरं ठरलं.

देशाला एक संवेदनशील आणि चांगल्या मनाचा व्यक्ती हवाय. ढोंग करणारे पंतप्रधान देशाला नकोयत ज्यांनी स्वत: निवडणुकीदरम्यान प्रचारसभा घेऊन करोनाचा प्रसार केला आणि आता रडण्याचं नाटक करत आहेत,” असा टोला संजय यांनी लगवाला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News