अहमदनगर Live24 टीम, 24 मे 2021 :- लग्नानिमित्त सोने खरेदी करायचं आहे, असं सांगून सराफ व्यावसायिकाला अहमदनगर जिल्ह्यात बोलावून त्याचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना अहमदनगर जिल्ह्यात घडली आहे.
हत्येनंतर त्याचा मृतदेह शेतात पुरण्यात आला होता. याबाबत सविस्तर माहिती अशी कि बीड जिल्ह्यातील शिरुर कासार येथील सराफी व्यावसायिक विशाल सुभाष कुलथे (वय २५) यांचा मृतदेह शेवगाव तालुक्यात आढळून आला होता.
भातकुडगांव येथील गट शेतकरी दत्तात्रय हरिभाऊ गायकवाड यांच्या शेतात मृतदेह पुरुन पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आरोपींनी केला होता. ज्ञानेश्वर शिवाजी गायकवाड याचे शिरुर कासार येथे सलूनचे दुकान आहे. त्याने सोने खरेदीचा बहाणा करून विशाल सुभाष कुलथे यांना आपल्या दुकानात बोलावलं.
लॉकडाऊनमध्ये आपले लग्न झाले असून जास्त सोने करायचे आहे, असे सांगून ऑर्डर देण्यात आली. दुकानातील तयार असलेले सोन्याचे दागिने घेऊन माझ्या दुकानात या, असे गायकवाड म्हणाला. कुलथे यांनी त्याच्यावर विश्वास ठेवून सलून दुकानात सोने घेऊन गेले.
तेथे गायकवाड याने साथीदारांच्या मदतीने त्यांचा खून केला आणि सोने घेऊन पोबारा केला. पोलिसांनी केतन लोमटे, शिवाजी गायकवाड यांना अटक केली आहे. मुख्य आरोपी ज्ञानेश्वर गायकवाड हा फरार आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम