अहमदनगर Live24 टीम, 24 मे 2021 :- नाभिक समाज हा अत्यंत मागासलेला आहे. सलून व्यवसायाशिवाय उत्पन्नाचे इतर साधन नाही. लाॅकडाऊन काळात व्यवसाय बंद मुळे समाजाची आर्थिक परिस्थिती हलाखीची झाली आहे.
सलून व ब्युटी पार्लर व्यवसाय अत्यावश्यक सेवेत समावेश करावा, अशी मागणी राष्ट्रीय जनसेवा पक्षाचे उपाध्यक्ष संजय पंडीत यांनी मुुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
लॉकडाऊनमुळे नाभिक समाज मेटाकुटीला आला आहे. आर्थिक परिस्थिती ढासळली आहे. घरभाडे, दुकानभाडे,विज बिल, बँक कर्ज, वैद्यकीय खर्च, घरातील दैनंदीन खर्चाची तोंड मिळवणी करताना त्रस्त झाला आहे.
राज्यात आज पर्यंत सत्तावीस समाज बांधवांनी आत्महत्या देखील केल्या. आम्ही शासनाला वारंवार मदतीची मागणी करुनही अद्याप मदत मिळाली नाही.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम