अहमदनगर Live24 टीम, 24 मे 2021 :- रामदेव बाबांसारखे लोक गोमूत्र, गोबर आणि कोरोनिल काढतात. अॅलिओपॅथीवर संशय घेतात. त्यामुळे आयएमएने रामदेव बाबांना नोटीसा पाठवल्या पाहिजे, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांनी योगगुरू रामदेव बाबांवर टीका केली आहे.
तसेच गोबर, गोमूत्र आणि रामदेव ही थेरपीच आता बंद करा, अशी मागणी त्यांनी केली. नदीमध्ये मृतदेह प्रवाहीत करणे, ऑक्सिजन अभावी लोके मरत आहेत, औषधांचा तुटवडा आहे, देशात लस उपलब्ध नसताना लस देण्याचा कार्यक्रम जाहीर करणे,
हे इंडियन मॉडेल कोणीच स्वीकारणार नाही अशा शब्दात त्यांनी मोदींच्या इंडियन मॉडेलचा समाचार घेतला. इंडियन मॉडेल झालेच पाहिजे परंतु हेच इंडियन मॉडेल असेल तर लोकांना यावर बोट ठेवण्याची संधी भाजपा निर्माण करुन देतेय असेही मलिक म्हणाले.
तसेच भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी महाराष्ट्र आणि केरळलाही आर्थिक मदत देण्याचं ट्विट केलं होतं. पण नंतर ते त्यांनी डिलीट केलं.
भाजपचा इतर पक्षाच्या नेत्यांवर आजवर दबाव होता. आता भाजपला आपल्या नेत्यांवरही दबाव टाकावा लागतोय.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम