बिग ब्रेकिंग : अहमदनगर जिल्ह्यात 1 जूननंतरही लॉकडाऊन कायम राहाणार !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 24 मे 2021 :- राज्यात लॉकडाऊन लावूनही काही जिल्ह्यात रुग्णसंख्या कमी झालेली नाही. अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रुग्ण संख्या कमी होत नाहीय,अहमदनगर जिल्ह्याचा समावेश रेड झोन मध्ये करण्यात आला आहे.

महाराष्ट्रातील कोरोना संसर्ग असलेल्या रेड झोनमधील जिल्हे वगळता राज्यातील लॉकडाऊन 1 जूननंतर शिथिल होण्याची शक्यता आहे. राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी हे संकेत दिले आहेत.

माहितीप्रमाणे राज्यातील 14 जिल्हे रेड झोनमध्ये आहेत. तिथले निर्बंध सरसकट शिथिल करता येणार नाहीत. कन्टेन्मेंट झोन करुन तिथे नियम कडक करावे लागतील तर जिथे रुग्ण संख्या कमी तिथे नियम शिथिल करावे लागतील, असं वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.

अहमदनगर , बुलढाणा, रत्नागिरी, सांगली, यवतमाळ, अमरावती, सिंधुदुर्ग, सोलापूर, अकोला,सातारा, वाशिम, बीड, गडचिरोली, आणि उस्मानाबाद हे 14 जिल्हे सध्या रेड झोनमध्ये आहेत.

त्यामुळे 31 मे नंतर जरी राज्यातील लॉकडाऊनमध्ये शिथीलता मिळाली, तरी या जिल्ह्यांमध्ये शिथीलता येण्याची शक्यता कमी आहे.अहमदनगर जिल्ह्याचा ही ह्या लिस्टमध्ये समावेश असल्याने 1 जूननंतरही लॉकडाऊन कायम राहू शकतो.

याबाबत बोलताना वडेट्टीवार म्हणाले, “महाराष्ट्रात आता कोरोना रुग्ण कमी होत आहेत. लॉक डाऊन शिथील करण्याची मागणी होत आहे. पुढच्या पाच सहा दिवसात परिस्थिती बघून निर्णय होईल.

माझ्या माहितीप्रमाणे 14 जिल्हे रेड झोनमध्ये आहेत. तिथे सरसकट शिथील करता येणार नाही. काही झोन करता येतील. कंटेन्मेंट झोन करून तिथे नियम कडक करावे लागतील.

जिथं रुग्ण संख्या कमी तिथे शिथील करावे लागेल” जे जिल्हे रेड झोन मध्ये आहेत तिथे कडक लॉकडाऊन असला पाहिजे. गृह विलगिकरणाला अर्थ नाही लोकांना संस्थात्मक विलगीकरण केलं पाहिजे. कुटुंबाच्या कुटुंब कोरोना बाधित होत आहे, असं वडेट्टीवार म्हणाले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe