अहमदनगर जिल्ह्यासाठी पालकमंत्र्यांना वेळ मिळाला ! ‘या’ दिवशी देणार भेट….

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 25 मे 2021 :-  राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ हे बुधवार, दिनांक २६ मे, २०२१ रोजी जिल्हा दौर्‍यावर येत असून त्यांच्या दौ-याचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

सकाळी ९-१५ वाजता हेलिकॉप्टरने भाळवणी, ता. पारनेर येथे आगमन. स. ९-३० वाजता खासदार शरदचंद्रजी पवार आरोग्य मंदिर कोविड सेंटरची पाहणी.

स.१० ते ११ वाजता तालुका पारनेर येथील कोरोना सद्यस्थिती, त्यावरील उपाययोजना आणि लसीकरणबाबत सर्व संबंधित लोकप्रतिनिधी आणि अधिकारी वर्ग यांच्यासमवेत आढावा बैठक.

(स्थळ- नंदनवन मंगल कार्यालय, भाळवणी). स. ११ वाजता भाळवणी येथून हेलिकॉप्टरने श्रीगोंदा हेलिपॅडकडे प्रयाण. स. ११.३० वाजता श्रीगोंदा येथे आगमन.

स. ११-३० ते दुपारी १२-३० वा. तालुका श्रीगोंदा येथील कोरोना सद्यस्थिती, त्यावरील उपाययोजना आणि लसीकरणाबाबत सर्व संबंधित लोकप्रतिनिधी आणि अधिकारी वर्ग यांच्यासमवेत आढावा बैठक.

(स्थळ – तुळशीदास मंगल कार्यालय, श्रीगोंदा.) दुपारी १२-३० ते १ वा. पत्रकार परिषद. (स्थळ – तुळशीदास मंगल कार्यालय, श्रीगोंदा.) दुपारी १ ते १-४५ वा. घन:शाम शेलार यांचे निवासस्थानी राखीव. दुपारी २ वाजता हेलिकॉप्टरने जुहू, मुंबई कडे प्रयाण.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News