विद्यापीठात नौकरी लावून देण्याच्या आमिष दाखवत दोघांना गंडवले

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 25 मे 2021 :- कोरोनामुळे गेल्या वर्षभरापासून अनेकांवर बेरोजगारीची कुर्हाड कोसळली आहे. यातच नौकरी मिळावी म्हणून अनेकजण सुशिक्षित तरुण अमिषाला बळी पडत असल्याचे दिसून येत आहे.

नुकताच असाच एक प्रकार जिल्ह्यात घडला आहे. राहुरी महात्मा फुले कृषी विद्यापीठात कारकून म्हणून नोकरीला लावून देतो असे सांगत एका भामट्याने दोघांकडून साडे सहा लाख रुपये घेऊन फसवणूक केली आहे.

याप्रकरणी दीपक बापू जाधव (रा. वासखेडी, ता. साक्री, जि.धुळे) याला शनिपेठ पोलिसांनी आज मंगळवारी अटक केली.

याबाबत अधिक माहिती अशी कि, वंदना अशोक मराठे उर्फ वंदना सचिन बुचडे (वय 31, रा.जोशी पेठ, जळगाव, ह.मु.मुंबई) यांनी तसेच त्यांचे चुलत भाऊ वाल्मीक सुरेश पाटील यांनी दीपक जाधव याला 2018 वर्षात 6 लाख 40 हजार 100 रुपये वेळोवेळी दिलेले आहेत.

काही रक्कम बँक खात्यात तर काही रक्कम ऑनलाईन वर्ग केली. दरम्यान 3 वर्ष होऊनही नोकरीला लावले ना पैसे परत केले.

आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर वंदना यांनी शनिपेठ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली. त्यानुसार जाधव याच्याविरुद्ध सोमवारी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News