अकोले :- राज्यात महाशिवआघाडी सत्ता स्थापन करणार हे नक्की झाले आहे. त्यामुळे अकोल्याचे नवनिर्वाचित आमदार डॉ. किरण लहामटे यांना मंत्रिपद मिळणार असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे.
मंत्रीपद वाटपात डॉ. किरण लहामटेंनी वैभव पिचडांसारख्या दिग्गज नेत्याचा पराभव केला असल्याने त्यांचे पारडे थोडे जड राहण्याची शक्यता आहे.
महाआघाडीतील फॉर्म्युल्यानुसार राष्ट्रवादी कॉंग्रेसला १३ मंत्रिपद मिळणार असल्याची चर्चा आहे. त्यातच डॉ. लहामटे यांचा राजयोगच चांगला असल्याने मंत्रिपदासाठी त्यांची वर्णी लागणार असल्याची चर्चा आहे.
आदिवासी चेहरा नसल्याने शिवाय शिक्षित आणि तरुण व्यक्तिमत्व असणारे डॉ. किरण लहामटे यांचा मंत्रीपदाचा विचार नक्की होणार आणि आदिवासी भागातील विकास नक्की होणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे.
शरद पवार यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आमदारांशी संवाद साधताना राष्ट्रपती राजवट लागू झाली असली तरी चिंता करायची नाही असे सांगितले.
तसेच आमदारांना निवडणुकीला सामोरे जावे लागणार नाही असे सांगून तुमच्या मतदारसंघामध्ये जाऊन जनतेची काम करा असा आदेशही दिला आहे.