अहमदनगर Live24 टीम, 26 मे 2021 :-श्रीरामपूर तालुक्यातील एकलहरे ग्रामपंचायत येथे नेमणुकीस असलेले ग्रामसेवक समीर लालाभाई मणियार हे कोरोना कर्तव्य करत असताना गावातील आटवाडी भागात राहणारे दोन तरुण त्यांना विना मास्क फिरताना दिसले.
कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता ग्रामसेवक मणियार यांनी या दोघांना कोरोना नियमांचे पालन करुन मास्क घालण्याचा सल्ला दिला.
त्या सल्ल्याचा या दोन तरुणांना राग आल्याने या दोघांनी ग्रामसेवक मणियार यांना शिवीगाळ करून धमकी दिली.
या प्रकरणी ग्रामसेवक मणियार यांनी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून आरोपी सौरभ अशोक पवार व प्रशांत अशोक पवार (रा. आटवाडी, एकलहरे,ता. श्रीरामपूर)
या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक घायवट हे करीत आहेत.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम