अहमदनगर Live24 टीम, 26 मे 2021 :- कोरोनामुळे देशातील शैक्षणिक व्यवस्था अक्षरश कोलमडली आहे. अनेक परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. नुकतेच 3 जुलै 2021 दिवशी आयोजित जेईई अॅडव्हान्स परीक्षा आता लांबणीवर पडली आहे.
आज त्याबाबतचं अधिकृत परिपत्रक जारी करत ही परीक्षा कोविड 19 परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर स्थगित केली जात आहे. परीक्षेची नवी तारीख लवकरच जाहीर केली जाईल असं म्हटलं आहे.
सध्या तरी जेईई एडव्हान्स परीक्षा पुढील निर्णय जाहीर होत नाही तोपर्यंत घेतल्या जाणार नाहीत. त्यामुळे योग्यवेळी या परीक्षांची तारीख आणि वेळ जाहीर केला जाईल.
या परीक्षांसाठी इच्छुक उमेदवारांना परीक्षांसंदर्भात अधिक माहिती हवी असल्यास ते Jeeadv.ac.in वर जाऊन अधिकृत नोटीस पाहू शकतात.
जेईई मेन परीक्षा पार पडल्यानंतर त्यामधील अडीज लाख विद्यार्थी देशभरातील आयआयटीज मध्ये प्रवेश मिळवण्यासाठी जेईई अॅडव्हानसची परीक्षा देतात.
त्यामधील मार्क्स आणि रॅंक नुसार पुढील प्रवेश प्रक्रिया सुरू होते. पण अद्याप देशात कोरोना स्थितीवर पूर्ण नियंत्रण मिळू शकलं नसल्याने अनेक राज्यांनी किमान मे महिन्याच्या अखेरीपर्यंत लॉकडाऊन कायम ठेवला आहे.
त्यामुळे अनेक परीक्षा लांबणीवर पडल्या आहेत. दरम्यान जेईई अॅडव्हान्स्ड 2021 परीक्षेसाठी 2 पेपर असतात. पहिल्या शिफ्टमध्ये सकाळी 9 ते दुपारी 12 वाजेपर्यंत पेपर I होतो.
दुसरी शिफ्ट दुपारी 2.30 ते सायंकाळी 5.30 दरम्यान पेपर II घेतला जातो. आता परीक्षेची नवी तारीख देखील jeeadv.ac.in. वर सांगितली जाईल.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम