दिलासादायक ! जिल्ह्याचा रुग्ण रिकव्हरीच्या रेटमध्ये होतेय सुधारणा

अहमदनगर Live24 टीम, 27 मे 2021 :- गेल्या वर्षभरापासून जिल्ह्यात कोरोनाने हाहाकार केला आहे. दुसर्या लाटेचा प्रभाव हा फेब्रुवारीच्या शेवट सुरु झाला व एक मोठी लाटच कोरोनाची पुन्हा आलेली दिसून आली.

दरदिवशी हजारोंच्या संख्येने जिल्ह्यात बाधितांची भर पडू लागली होती. मात्र आता परिस्तिथी बदलू लागली आहे. व जिल्ह्याची वाटचाल पुन्हा एकदा कोरोनामुक्तीकडे चालली आहे.

जिल्ह्यात गेल्या 24 तासात नव्याने 2 हजार 207 नवे करोना रुग्ण वाढले आहेत. करोनातून मुक्त होणार्‍यांच्या तुलनेत हा आकडा कमी असला

तरी काल नव्याने 66 करोना मृतांची भर जिल्ह्याच्या एकूण आकडेवारीत पडली आहे. यामुळे करोना मृतांचा आकडा आता 3 हजारांच्या जवळ पोहचला आहे.

जिल्ह्यात काल 3 हजार 713 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे करोनातून बरे झालेल्यांची संख्या आता 2 लाख 38 हजार 378 इतकी झाली आहे.

रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे 93.42 टक्के झाले आहे. तर उपचार सुरू असणार्‍यांची संख्या 13 हजार 830 पर्यंत खाली आली आहे.