अहमदनगर Live24 टीम, 27 मे 2021 :- गेल्या अनेक वर्षा पासून प्रलंबित असलेला एलईडी पथदिव्याचा प्रकल्प शहरामध्ये साकारण्यात येणार आहे. यामुळे संपूर्ण शहर एलईडी दिव्यांनी प्रकाशमय होणार असून यामुळे विजेची बचतही होणार आहे.
यासाठी लवकरात लवकर योग्य निविदेला मंजुरी देऊन शहरातील पथदिव्याचा प्रश्न मार्गी लावावा अशा सुचना महापौर बाबासाहेब वाकळे यांनी केले.
मनपाच्या वतीने नगर शहरातील ठेकेदारा मार्फत कचरा संकलनाचा निर्णय घेतल्या नंतर ख-या अर्थाने आपले शहर कचराकुंडी मुक्त झाले याच धर्तीवर शहरामध्ये ठेकेदारा मार्फत 35 हजार एलईडी पथदिवे बसविण्याचा निर्णय घेतला असून दोन निविदा प्राप्त झाल्या आहेत.
आता दोन्ही ठेकेदारांना प्रायोजिक तत्वावर कुष्ठधाम रोडवर एलईडी पथदिवे बसविण्याची मुदत दिली होती ती पूर्ण झाली असून लवकरच एजन्सीचा अहवाल आल्यानंतर शहरामध्ये एलईडी पथदिवे बसविण्याच्या कामाला सुरूवात होणार आहे.
दरम्यान गेल्या अनेक महिन्यापासून शहरातील पथदिवे बंद असल्यामुळे अंधाराचे साम्राज्य निर्माण झाले आहे. विद्युत विभागा मार्फत वेळेवर बंद पडलेले पथदिवे बसविण्यात येत नाही या अंधारामुळे छोटे मोठे अपघात होत आहेत.
याच बरोबर चो-यांचे प्रमाणही वाढले आहे लवकरात लवकर पथदिवे बसवावेत अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत होती.
मात्र आता आमदार संग्राम जगताप व महापौर वाकळे यांच्या प्रयत्नातून एलईडी पथदिव्याचा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. यामुळे मनपाची आर्थिक बचत होवून विजेची बचतही होईल यामाध्यमातून मनपाला फायदा होईल व शहरही प्रकाशमय होण्यास मदत हाईल.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम