अवैध दारू विक्री करणाऱ्या एकाला पोलिसांकडून अटक

अहमदनगर Live24 टीम, 28 मे 2021 :-  जिल्ह्यात लॉकडाऊन असून कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहे. यातच जिल्ह्यात अवैध धंद्यांचा सुळसुळाट झाला आहे.

यातच यावर पोलिसांकडून कारवाया केल्या जात आहे. नुकतेच भिंगार कॅम्प पोलिसांनी अवैध गावठी हातभट्टी, देशी व ताडी दारूची विक्री करणार्या एकाला अटक केली.

भाऊ ऊर्फ जय विठ्ठल भिंगारदिवे (वय 45 रा. घासगल्ली, भिंगार) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. दरम्यान पोलिसांनी संबंधित आरोपीकडून 30 हजार रूपयांची तीनशे लीटर हातभट्टी दारू,

2 हजार 834 रूपयांच्या 109 देशी दारूच्या बाटल्या व तीन हजार रूपयांची ताडी अशी 35 हजार 834 रूपये किंमतीची दारू जप्त केली असून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.