अहमदनगर Live24 टीम, 29 मे 2021 :- कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना बाधा होण्याची शक्यता आहे. संभाव्य धोका विचारात घेऊन लहान मुलांवरील उपचारांसाठी शासनाने औद्योगिक प्रशिक्षण
संस्थेच्या नवीन इमारतीत अद्ययावत कोविड सेंटर सुरू करावे. नगरपालिकेने त्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी केली.
कोपरगाव शहरालगत असलेल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या इमारतीची कोल्हे यांनी बुधवारी पाहणी केली. कोट्यवधी रूपये खर्चून उभारण्यात आलेली ही इमारत वापराविना पडून आहे.
या इमारतीत अद्ययावत कोविड सेंटर उभारल्यास शहरासह तालुक्यातील रुग्णांना मोठा फायदा होईल. तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेऊन शासनाने तेथे कोविड सेंटर उभारावे,
अशी मागणी कोल्हे यांनी केली.पुरेशा सुविधा मिळाव्यात, म्हणून शासकीय यंत्रणेबरोबर विविध सामाजिक संस्थांनी पुढाकार घेतला. त्यामुळे रुग्णसंख्या कमी होण्यास मदत झाली आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम