अहमदनगर Live24 टीम, 29 मे 2021 :- पहाटचे 1 वाजता पोलिस ठाण्याचा फोन खणाणला…हॅलो दारूने भरलेला ट्रक राहुच्या दिशेने येतोय, तो आडवा…आरोपी पकडा.., मग, सुरू झाले थरारक ऑपरेशन, राहुरी खुर्द ते कोल्हार तब्बल वीस किलोमीटर त्या ट्रकचा सिनेस्टाईल पाठलाग.
पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ खाजगी गाडीत तर त्यांचे पथक सरकारी गाडीत, कोल्हारजवळ त्या ट्रकला पकडले, मात्र त्या ट्रकमधील चालक गाडीतुन उडी फेकून पळण्याच्या तयारीत असतानाचा पोलिसांनी त्याच्यावर झडप मारली,
त्याने लगेचच चाकूने केले सपासप वार, त्यात एक पोलिस जखमी अन् तो भामटा ट्रक चालक अंधाराचा फायदा घेऊन झाला पसार…! माञ या कारवाईत ४५ लाखाचा मुद्देमाल सहीसलामत मिळाल्याने पोलिसांनी टाकला सुटकेचा निश्वास.
ही सर्व थरारक घटना एखाद्या चित्रपटाला लाजवेल अशीच आहे मात्र ही घटना घडली राहुरी पोलिसांच्या बाबतीत. शुक्रवारी सायंकाळी औरंगाबाद हुन पुण्याकडे दारूने भरून चाललेला ट्रक अहमदनगर येथील एमआयडीसी परिसरातुन अत्रात चार चोरट्यांनी चाकु,
कत्ती व गावठी कट्याचा धाक दाखवून हा ट्रक पळवला, सदर ट्रक राहुरीच्या दिशेने पळाला असल्याची माहिती नियंत्रण कक्षावरून पोलिस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांना कळाली.त्यांनी क्षणाचाही विलंब न करत दोन स्वंतत्र पथक तयार केले.
पोलिस उपनिरीक्षक निलेशकुमार वाघ,निरज बोकील,पोकाॅ.अजिनाथ पाखरे,लक्ष्मण बोडखे,उत्तरेश्वर मोराळे,वैभव साळवे,सचिन ताजने आदिंनी राहुरी खुर्द येथे सापळा लावला माञ भरधाव पळणारा हा ट्रक पुढे निसटला येथुन पुढेही पोलिसांनी पाठलाग सुरूच ठेवला
सिनेस्टाईल सुरू असलेल्या पाठलाग दरम्यान कोल्हार खुर्द पुलाजवळ चालक लक्ष्मण बोडखे यांनी त्या ट्रक ला गाडी आडवी लावली तर लगेच दुस-या गाडीतील चालक अजिनाथ पाखरे यांनी पाठीमागे दुसरी गाडी लावलीतर लगेचच वैभव साळवे यांनी त्या चालकावर झडप घातली तर त्या भामट्याने साळवे यांच्यावर चाकुचे सपासप वार केले,
यात पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी आणि तो भामटा अंधाराचा फायदा घेत निसटलाचं…! राहुरी पोलिसांनी या कारवाईत ४५ लाखाचा मुद्देमाल एमआयडीसी पोलिसांकडे सुपूर्त केला.सर्व थरारक घटनेनंतर पोलिसांनी सुटकेचा निःश्वास टाकला.पोलिसांनी केलेल्या या कामगिरीने राहुरी पोलिसांचे कौतुक केले जात आहे. ही सर्व थरारक घटना एखाद्या चित्रपटाला लाजवेल अशीच आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम