अहमदनगर Live24 टीम, 29 मे 2021 :- कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने मार्च व एप्रिल महिना केडगावकरांसाठी खूपच चिंताजनक व भीतीदायक ठरला. मात्र मे महिन्यात नागरिकांना चांगलाच दिलासा मिळाला आहे.
गेल्या चार महिन्यात दोन हजार रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढतच आहे.
यातच दुसऱ्या लाटेचा चांगलाच प्रभाव जिल्ह्यावर झालेला दिसून आला. रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे केडगावमधील बहुतांश भाग प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आला होता.
मात्र मे महिन्यात केडगावकरांना चांगलाच दिलासा मिळाला आहे. केडगावात आतापर्यंत ११ हजार नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.
फेब्रुवारी ते एप्रिल या तीन महिन्यात केडगावमधील रुग्णसंख्या १ हजार ८८९ इतकी झाली होती. त्यात मे महिन्यात घट झाली आहे. या महिन्यात केडगावात ५५५ इतके कोरोना बाधित रुग्ण आढळून आले.
यातील ४१० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. सध्या ११३ इतके सक्रिय रुग्ण उरले आहेत. गेल्या चार महिन्यात केडगावमध्ये २ हजार ४४४ इतक्या रुग्णांची नोंद झाली.
यातील २ हजार ६५ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. केडगावमध्ये आतापर्यंत १० हजार ७१२ नागरिकांच्या लसीकरणाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम