अहमदनगर Live24 टीम, 29 मे 2021 :- श्रीरामपूर शहरातील संगमनेर रोडवर असणाऱ्या प्रसिद्ध महाराष्ट्र वाईन्स शॉप जवळील परिसरात एका इसमाला तलवार बाळगल्याप्रकरणी पोलिसांनी तब्यत घेतले आहे.
हेमंत उर्फ दत्तू किशोर शेळके (वय वर्ष 34 ,रा श्रीरामपूर) असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. आरोपी शेळकेला श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनच्या पथकाने धरले.

file photo
त्यावेळी त्याच्याकडे विनापरवाना बेकायदा एक धारदार लोखंडी पात्याची तलवार मिळाली. श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई किशोर जाधव यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी शेळके याला पोलिसांनी पोलिसांकडून तात्काळ अटक करण्यात आली आहे.या महिन्यात श्रीरामपूर शहर पोलिसांनी श्रीरामपूर शहरातल्या वेगवेगळ्या आरोपींकडून एकूण दोन गावठी कट्टे व पाच तलवारी हस्तगत केल्या आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम