खासदार विखे म्हणाले.. महापालिका स्वतःचे हॉस्पिटल उभारू शकत नाही हे दुर्दैव

Ahmednagarlive24
Updated:

अहमदनगर Live24 टीम, 29 मे 2021 :- कोरोनाचे संकट असताना महानगरपालिका साधे स्वतःचे हॉस्पिटल सुरू करू शकले नाही. तसेच उपचार करण्यासाठी तात्काळ उपाययोजना करू शकले नाही, यासारखे दुर्दैव नाही, अशी खंत खासदार सुजय विखे यांनी व्यक्त केली.

सावेडी येथील प्रस्तावित व्यापारी संकुलाच्या जागेमध्ये तात्काळ हॉस्पिटल उभारा. तसेच एखाद्या खाजगी संस्थेशी करार करून त्यांच्याबरोबर आरोग्याच्या सेवा सुविधा सुद्धा नगरकरांना उपलब्ध करा. त्यासाठी निविदा मागवून घ्या, असे आदेश खासदार विखे यांनी बैठकीत दिले.

आज महानगरपालिकेमध्ये आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. कोरोनाची लाट आल्यानंतर ज्या पद्धतीने आपण उपाययोजना करायला पाहिजे होत्या त्या केल्या गेल्या नाहीत. नुसतेच मंगल कार्यालय घेतले.

मात्र, त्याठिकाणी असलेले पेशंट सिरीयस झाल्यानंतर कुठे गेले, कोण कोणाला गोळ्या देत होतं, कोण कोणावर उपचार करत होतं, ते कोणालाच कोणालाच ठाऊक नाही. असा सगळा गलथान कारभार याठिकाणी पाहायला मिळाला.

पेशंट सिरीयल झाल्यावर त्यांना ऑक्सिजन, व्हेंटिलेटर असलेले हॉस्पिटल शोधण्यासाठी तयारी करावी लागली. मग येथील महानगरपालिकेच्या प्रशासनाने केले काय, हा खरा प्रश्न निर्माण झालेला आहे.

वास्तविक पाहता, आपण कोट्यवधी रुपये बूथ हॉस्पिटल सारख्याला आपण देतो. आपण स्वतःचे हॉस्पिटल सुरू करू शकत नाही. उपयोजना करू शकत नाही, यासारखे दुर्दैव नाही, असेही खासदार विखे म्हणाले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe