वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने भिंत कोसळली; सुदैवाने जीवितहानी नाही

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 30 मे 2021 :- जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले असून हवामान विभागाने पावसाचा इशारा दिला होता.

त्यानुसार काळ जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसासह जोरदार वारे वाहत होते. यातच राहुरी तालुक्यात वादळी वार्‍यासह पावसाने जोरदार हजेरी लावली.

त्यामध्ये करजगाव येथील शेतकरी बाबासाहेब सुर्यभान गायके या शेतकर्‍यांचे राहत्या घराचे वादळी वार्‍यासह पावसाने भिंती पडुन छतावरील पत्रे उचकले.

सुदैवाने घरामध्ये असलेली 7 वर्षाची मुलगी बाहेर पळाल्याने बालंबाल बचावली. याबाबत अधिक माहिती अशी कि,तालुक्यात सायंकाळच्या सुमारास अचानक जोरदार वारे व पाऊस सुरू झाला.

अचानक आलेल्या वादळी वार्‍यानी करजगाव येथील शेतकरी बाबासाहेब गायके आपली पत्नी व मुलीसह शेतीत वस्तीवर राहतात अचानक आलेल्या वादळी वार्‍यासह पावसाने त्यांच्या राहत्या घराची भिंत पडुन पत्रे उचकले,

त्याची सात वर्षाची मुलगी घरात होती परंतु वार्‍याचा आवाज खुपचं असल्याने ती मुलगी घाबरली व गोठ्यात उभे असलेले आई, वडिलांकडे पळाली त्यामुळे सुदैवाने जिवीत हानी टळली.

दरम्यान येथील सरपंच शनिफ पठाण यांनी कामगार तलाठी, ग्रामसेवक यांनी पडझड झालेल्या घराची पाहणी करून पंचनामा केला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe