अहमदनगर Live24 टीम, 2 जून 2021 :- खासदार सुजय विखे यांनी कार्यकर्त्याचे ऐकून वेड्यासारखी टीकाटिप्पणी करू नये.आम्ही वाड्यावर बसुन काम पाहत नाही.कोविड काळात आढावा बैठका घ्यायच्या सोडुन बंद कोविड केअर सेंटरची पहाणी करणा-यासाठी यांना आता वेळ भेटला,
अन् कार्यकर्त्यांचे ऐकुन वेड्यासारखं टिका केली हि वेळ राजकारणात करण्याची नाही तर नागरीकांना दिलासा देण्याची आहे.असे म्हणत राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी खासदार सुजय विखे पाटील यांचा चांगलाच समाचार घेतला.
मंगळवारी राञी नामदार प्राजक्त तनपुरे यांनी व्हिडिओ काॅन्फरसद्वारे पञकार परीषद आयोजित केली होती.त्यात त्यांनी सुजय विखे यांच्या आरोपाला सडेतोड उत्तर दिले.ते पुढे म्हणाले की, लसीकरणाबाबत केंद्र सरकार हे सफशेल अपयशी ठरले आहे.
खर तर यांनी लसीकरणाचा योग्य पुरवठा उपलब्ध करून नागरीकांना दिलासा देन गरजेचे होते पण ते त्यांना जमले नाही.चोदा वित्त आयोगाच्या व्याजाच्या निधीतून रूग्ण वाहीका घेण्यासाठी राज्याची परवानगी घेण्यात आली होती.
राज्य सरकारचा एक भाग म्हणून आम्ही लोकार्पण केले आहे.तर दुस-यांनी केलेल्या लोकार्पणाबाबद देखील आमचा अजिबात विरोध नाही पण विनाकारण राजकारण केल जातय.
खर तर हि वेळ राजकारणात करण्याची आजिबात नाही परंतु आमच्यावर झालेल्या आरोपामुळे आम्हाला हे उत्तर देण्याची वेळ आली.त्यांनी देखील आता घरात न बसता नागरीकांना दिलासा देण्याचे काम करावे असे देखील राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी यावेळी म्हटले आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम