अहमदनगर Live24 टीम, 6 जून 2021 :- कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव कमी करण्यासाठी जिल्ह्यात लसीकरण अत्यंत महत्वाचे बनून बसले आहे. यातच नागरिकांचा मोठा प्रतिसाद व लसीचा होणार तुटवडा यामुळे लसीकरणाचा गोंधळ उडाला आहे.
आपल्यालाही लस मिळावी यासाठी सर्वसामान्यांसह नेतेमंडळी देखील धावपळ करू राहिले आहे. यातच जिल्ह्यात एक खळबळजनक घटना घडली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील एका आरोग्य कर्मचाऱ्याने आपल्या नातेवाईकांना देण्यासाठी चक्क आरोग्य केंद्रातील लस चोरून आणल्याचे समोर आले आहे.
आष्टी तालुक्यातील कडा आरोग्य केंद्रात लस देताना हा प्रकार उघड झाला. याबाबत अधिक माहिती अशी कि, विठ्ठल खेडकर हा आरोग्य कर्मचारी कर्जत तालुक्यातील चापडगाव आरोग्य केंद्रात कार्यरत आहे. शनिवारी त्याने लसीची एक कुपी चोरून कडा आरोग्य केंद्रात आला.
येथे आपल्या सहा नातेवाईकांना लस देण्यास सांगितले. परंतु हा प्रकार गंभीर असल्याने कर्मचाऱ्यांनी वैद्यकीय अधिकारी यांना सांगितला. त्यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर.बी. पवार यांना हा प्रकार सांगितला. यावर त्यांनी तत्काळ या कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
दरम्यान, लस देण्यासाठी आणलेले नातेवाईक आणि संबंधित खेडकर नामक कर्मचाऱ्याने घातलेला गोंधळ हा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. यानिमित्ताने आरोग्य कर्मचाऱ्यांकडून होत असलेला गलथान कारभार चव्हाट्यावर आला आहे. आता या प्रकरणात काय कारवाई होते, याकडे लक्ष लागले आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम