अहमदनगर Live24 टीम, 7 जून 2021 :- पारनेर तालुका सैनिक सहकारी बँकेत संचालक नातेवाइकांची नियमबाह्य नोकर भरती झाल्याची तक्रार संचालक सुदाम कोथिंबिरे यांनी केली होती. सदर नोकर भरती रद्द झाली असून, संचालक कोथिंबिरे व अन्याय निवारण निर्मुलन सेवा समितीचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे.
सैनिक बँक संचालक मंडळाने नियमबाह्य आपल्या नातेवाईकांची नोकर भरती केली होती. या नोकर भरतीला संचालक सुदाम कोथिंबीरे यांनी सहकार विभागाकडे दाद मागितली होती.
सदर तक्रारीची सहकार विभागाने दखल घेऊन लेखापरीक्षण करण्याचे आदेश काढले आहेत. परिणामी संचालक मंडळाने कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी 31 मे रोजीच्या संचालक मासिक बैठकीत नियमबाह्य नातेवाईक नोकर भरती रद्द केल्याचे कोरडे यांनी कळविले असल्याचे कोथींबीरे यांनी म्हंटले आहे.
या नोकर भरतीत चेअरमन शिवाजी व्यवहारे यांचा मुलगा, व्हा चेअरमन शिवाजी सुकाळे यांचा वडनेर गावचा सरपंच असलेला मुलगा, संचालक नामदेव काळे यांची स्नुषा, संचालक तोरडमल यांची मेहुणी व अन्य संचालक यांचे नातेवाईक समाविष्ट होते.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम