उद्योजकाचा बंगला फोडून चोरी, चोरटे सीसीटीव्हीत कैद

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 8 जून 2021 :- राहुरी येथील उद्योजक विजयकुमार सेठी यांच्या बंगल्याच्या दाराचे कुलुप तोडून अज्ञात चोरट्यांनी २० हजार रूपये किंमतीचा एलसीडी टिव्ही चोरून नेल्याची घटना सोमवार दिनांक ७ जून रोजी घडली.

हा सर्व प्रकार सीसीटिव्ही कॅमेर्‍यात कैद झाला आहे. राहुरी शहर हद्दीतील नगर मनमाड राज्य महामार्गावर भूजाडी पेट्रोल पंप समोर विजयकुमार सेठी यांचा बंगला आहे.

सध्या ते पुणे येथे वास्तव्यास असल्याने बंगला बंद असतो. महिन्यातून दोन तीन वेळा ते राहुरी येथील बंगल्यात रहावयास येत असतात.

पहाटे पाऊने तिन वाजे दरम्यान चार अज्ञात भामट्यांनी सेठी यांच्या बंगल्याचा मागील दरवाजाचे कुलुप तोडून आत प्रवेश केला. सुमारे एक तास संपूर्ण बंगल्याची उचकापाचक केली. अखेर त्या भामट्यांनी २० हजार रूपये किंमतीचा ५४ इंची एलसीडी टिव्ही चोरून नेला.

सदर सर्व प्रकार बंगल्यातील सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झालाय. त्यामध्ये चार अज्ञात चोरटे बंगल्यात घुसून टिव्ही चोरून नेल्याचे स्पष्ट दिसत आहेत.

तसेच त्या चोरांचे चेहरे दिसत आहेत. विजयकुमार सेठी हे राहुरीत राहत नसल्याने राहूरी फॅक्टरी येथील दिपक त्रिभुवन यांना चोरीची घटना कळताच त्यांनी राहुरी पोलिसात धाव घेऊन पोलिसांत फिर्याद दिली असून या घटनेचा पुढील तपास राहुरी पोलिसांकडून सुरू आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe