हनीट्रॅप ! जखणगावच्या तरूणीसह तिच्या पंटरला पोलिसांनी केले गजाआड

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 11 जून 2021 :- जिल्ह्यातील हनीट्रॅप प्रकरण सध्या चांगलेच चर्चेचा विषय बनले आहे. नुकतीच याप्रकरणी जखणगावच्या तरूणीसह अमोल सुरेश मोरे नामक व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे.

दरम्यान यांना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने 14 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, नगर तालुक्यातील एका बागयतदाराला प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्याच्याकडे खंडणी मागणी केल्या प्रकरणी जखणगावच्या तरूणीसह तिघांविरोधात गुन्हा दाखल आहे.

त्याचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले आहे. नगर शहरातील एका क्लासवन अधिकार्‍याला घरी बोलावून त्याच्या सोबत नाजूक संबंध ठेवत त्याचे व्हिडीओ चित्रिकरण करण्यात आले होते. यानंतर सदर तरूणी व तिच्या पंटरांनी अधिकार्‍याकडे तीन कोटीची खंडणी मागितली होती.

या प्रकरणी अधिकार्‍याने पुढे येत पोलिसांत फिर्याद दिली. यात संबंधीत तरूणीसह तिचे पंटर अमोल मोरे, सचिन खेसे, महेश बागले, सागर खरमाळे यांच्याविरोधात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात तरूणीसह मोरे याला पोलिसांनी वर्ग करून घेतले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe