साईसंस्थानच्या अध्यक्षपदासाठी चार आमदारांची नावे चर्चेत…

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 13 जून 2021 :- राज्यातील सर्वात श्रीमंत असलेल्या साईसंस्थानच्या अध्यक्षपदासाठी जिल्ह्यातील चार आमदारांची नावे चर्चेत आहेत.

मात्र अध्यक्षपदाची माळ काेणाच्या गळ्यात याकडे लक्ष लागले आहे. या पदासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीत रस्सीखेच सुरू अाहे.

उच्च न्यायालयाने विश्वस्त निवडीबाबत राज्य सरकारला ठणकावल्याने साईमंदीर उघडण्यापूर्वीच विश्वस्त नियुक्तीचा बिगूल वाजेल अशी चिन्हे आहेत.

साईंस्थानच्या अध्यक्षपदासाठी आमदार आशुतोष काळे, आमदार रोहित पवार, आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार नीलेश लंके यांच्यासह युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांची नावे चर्चेत आहेत.

राष्ट्रवादीकडून कोपरगावचे आमदार आशुतोष काळेंचे नाव आघाडीवर आहे. स्थानिक, सामाजिक व राजकीय परिस्थिती माहिती ही काळे यांची जमेची बाजू आहे.

आमदार रोहित पवार यांच्याही नावाची चर्चा आहे. पवार संस्थानसाठी नवखे आहेत मात्र त्यांना मोठ राजकीय पाठबळ आहे.

कोरोना काळात उत्कृष्ट काम करणारे आमदार निलेश लंके यांच्या नावासाठी जनतेतुन होणारी मागणी ही लंकेची जमेची बाजू आहे.

तर काँग्रेसकडून आमदार डॉ. सुधीर तांबे व युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांची नावे चर्चेत आहेत. श्रद्धा व विकासाची सांगड घालणारा, भक्तांच्या समस्या जाणून घेणारा,

शिर्डीच आंतराष्ट्रीय महत्त्व वृद्धींगत करतांनाच सामाजिक दृष्टीकोण असणारा अध्यक्ष साईसंस्थानला मिळावा अशी भाविकांची अपेक्षा असते.

उपाध्यक्ष पदासाठी शिवसेनेचे रविंद्र मिर्लेकर यांचे नाव निश्चित आहे. विश्वस्त पदासाठी मुंबई, मालेगाव, बीड, राहुरी येथील पदाधिका यांना संधी मिळण्याची चिन्हे आहेत. काँग्रेसची नावेही लवकरच निश्चित होणार अाहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe