अहमदनगर Live24 टीम, 13 जून 2021 :- राजाराम शेळके याने वडिलांचा खून केल्याची सल संग्राम कांडेकर याच्या मनात होती. राजाराम तुरुंगातून आल्यानंतर त्याचा काटा काढण्याची त्याची योजना होती.
त्यासाठी त्याने एक धारदार तलवार देखील आणली होती. घटना घडण्यापूर्वी तीन ते चार दिवस संग्राम राजारामच्या मागावर होता. राजारामच्या शेताशेजारील उसामध्ये लपून बसून तो एकटा सापडण्याची संधी संग्राम शोधत होता.

शुक्रवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास राजाराम शेतामधील शेततळ्याचे काम करणाऱ्या मजुरांना सूचना देऊन एकटाच परतत होता. ही संधी साधत संग्रामने पाठीमागून येत राजारामच्या मानेवर तलवारीचा जोरदार वार केला. एकाच वारामध्ये राजाराम जमिनीवर कोसळला.
तलवारीचा वार झाल्यानंतर राजाराम याच्या तोंडातून शब्ददेखील फुटला नाही. अशा प्रकारे आपल्या वडीलांच्या हत्येचा बदला घेतला.
अशी माहिती संग्राम कांडेकरने पोलिसांना दिली. नारायणगव्हाणचा माजी सरपंच राजाराम शेळके याच्या हत्येचे गूढ उकलले असून, तत्कालीन उपसरपंच प्रकाश कांडेकर यांचा मुलगा संग्राम कांडेकर याने वडिलांच्या हत्येचा बदला घेतला असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.
तशी कबुली शनिवारी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला दिली. राजकीय वर्चस्व, आपसांतील भांडणाच्या कारणावरून नारायणगव्हाणचा माजी सरपंच राजाराम शेळके याने भाडोत्री नेमबाजांकडून तत्कालीन उपसरपंच प्रकाश कांडेकर यांची हत्या घडवून आणली होती.
याप्रकरणी राजाराम शेळके याच्यासह त्याचा मुलगा राहुल तसेच इतर तिघांना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. करोना संसर्गाच्या पर्श्वभूमीवर राजारामसह इतर आरोपींना न्यायायलाने विशेष रजा मंजूर केली असून, वर्षभरापासून राजाराम नाराणगव्हाण येथील त्याच्या शेतामध्ये वास्तव्यास होता.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम













