अहमदनगर Live24 टीम, 14 जून 2021 :- लोकप्रितिनिधी येतात व जातात. मात्र कोणत्या लोक प्रतिनिधींनी कोणती कामे केली याचा हिशोब जनतेकडे असतो.
काळे परिवाराला मतदारसंघातील जनतेने ज्या ज्या वेळी सेवा करण्याची संधी दिली, त्या त्यावेळी मतदारसंघाचा विकास झाला.
हा विकासाचा वारसा डोळ्यासमोर ठेवून जनतेच्या स्मरणात राहील, असा मतदारसंघाचा विकास करून दाखवणार आहे, असे प्रतिपादन आमदार आशुतोष काळे यांनी केले.
कोपरगाव तालुक्यातील जवळके ग्रामपंचायत कार्यालयाच्या नूतन इमारतीच्या कामाचे भूमिपूजन आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी सभापती पौर्णिमा जगधने, उपसभापती अर्जुनराव काळे, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुनील शिंदे, सचिन रोहमारे,
आनंदराव चव्हाण, सरपंच बाबुराव थोरात, राहुल रोहमारे, रोहिदास होन, देवेन रोहमारे, नंदकिशोर औताडे, किसन पाडेकर, युवराज गांगवे, ज्ञानेश्वर गव्हाणे, विजय कोटकर,
सिकंदर इनामदार, राजेंद्र औताडे, राहुल जगधने, शिवाजी थोरात, लक्ष्मण थोरात, गणेश थोरात, बाळासाहेब गव्हाणे, उमेश देवकर,
अशोक नेहे, आनंद भडांगे, राजश्री थोरात, सुधाकर थोरात, जगन्नाथ शिंदे, राजेंद्र औताडे, गोकुळ पाचोरे, बीडीओ सचिन सूर्यवंशी उपस्थित होते.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम