नगर तालुक्यातील ‘या’ गावात आढळून आला बिबट्याचा वावर

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 16 जून 2021 :- गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्या व त्याच्या हल्ल्याच्या घटना कमी झाल्या होत्या. मात्र आता पुन्हा एकदा जिल्ह्यात बिबट्याने धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे.

नुकतेच बिबट्याने नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथे काहींना आपले दर्शन दिले. दरम्यान नगर शहरा लगत असलेल्या या गावात बिबट्याचा वावर असल्याने ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

वनविभागाशी संपर्क साधून देखील उपाययोजना केल्या जात नसल्याने ग्रामपंचायतीच्यावतीने वनक्षेत्रपाल यांना निवेदन देऊन बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली.

दरम्यान जिल्ह्यातील उत्तरेकडील भागामध्ये बिबट्याचा वावर अधिक असलेला आढळून आला आहे. यातच आता नगर शहराच्या जवळच असलेल्या या गावात बिबट्या आढळून आल्याने परिसरातील नागरिकांमध्ये कमालीची दहशत पसरली आहे.

दरम्यान निमगाव वाघा गावातील जावली व भगत मळा परिसरातील शेती मध्ये गेल्या आठ दिवसांपासून बिबट्या आढळून येत आहे.

त्यामुळे शेतकर्‍यांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोणताही अनुचित प्रकार घडण्यापुर्वी बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी पुढील उपाययोजना करण्याची मागणी ग्रामपंचायतीच्यावतीने वनविभागाला करण्यात आली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe