नरभक्षक बिबट्याचा बंदोबस्त करा; नागरिक भीतीच्या सावटाखाली

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 17 जून 2021 :- गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्या व त्याच्या हल्ल्याच्या घटना कमी झाल्या होत्या. मात्र आता पुन्हा एकदा जिल्ह्यात बिबट्याने धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे.

नुकतेच नगर तालुक्यातील निमगाव वाघा व नेप्ती गावात बिबट्यामुळे दशहत निर्माण झाली आहे. यामुळे तातडीने बिबट्याचा बंदोबस्त करण्याच्या मागणीचे दोन्ही गावातील ग्रामस्थांच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे.

यावेळी निमगाव वाघाचे ग्रामपंचयत सदस्य नाना डोंगरे, डॉ. विजय जाधव, माजी सरपंच साहेबराव बोडखे, दुध डेअरीचे चेअरमन गोकुळ जाधव, अनिल डोंगरे, ग्रामपंचायत सदस्य प्रमोद जाधव, दिलावर शेख, नेप्तीचे माजी सरपंच संजय जपकर, अतुल जपकर उपस्थित होते.

शहरालगत असलेल्या निमगाव वाघा येथील भगतमळा व नेप्तीच्या रानमळा भागात दोन मोठे व दोन लहान बिबट्यांचे वावर आहे. या भागाजवळ मोठ्या प्रमाणात वस्ती असून शेतकरी दुग्ध व्यवसायासाठी बाहेर पडत असतात.

हे बिबटे चारा पिकांमध्ये दबा धरून बसलेले असल्याने शेतकर्‍यांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून पहिले असता भक्ष्याच्या शोधात आलेला बिबट्या शेतकर्‍यांच्या शेळ्या-मेंढ्या, पाळीव कुत्री, वासरे या पाळीव प्राण्यांवर हल्ले करून त्यांना भक्ष्य बनवत आहेत.

बिबट्याची वाढती दहशत पाहता वनविभागाने परिसरात पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी वन विभागाकडे केली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe