शिवीगाळ करणाऱ्या ‘त्या’ माजी आमदाराला तात्काळ अटक करावी

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 17 जून 2021 :- भुसावळ येथील माजी आमदार संतोष चौधरी यांना त्वरित अटक करावी अशा आशयाचे निवेदन कोपरगाव नगरपालिका कर्मचारी संघटनेच्यावतीने कोपरगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे व नगराध्यक्ष विजय वहाडणे यांना देण्यात आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आदेशानुसार अवैध कामाची पाहणी करण्यासाठी भुसावळ नगरपालिकेचे मुख्याधिकारी व इतर अधिकारी कर्मचारी गेले असताना

माजी आमदार संतोष चौधरी यांनी भुसावळ नगरपालिकेचे मुख्याधिकारी संदीप चिद्रवार व इतर अधिकारी यांना अश्लील व अर्वाच्य भाषेत शिवीगाळ व दमदाटी करून

अंगावर धावून जात शासकीय कामात अडथळा निर्माण केला. या घटनेचा कोपरगांव नगरपरिषदेमध्ये कार्यरत महाराष्ट्र राज्य नगरपरिषद संवर्ग अधिकारी यांचेकडून आज निषेध करण्यात आला.

नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे व नगराध्यक्ष विजय वहाडणे यांना या घटनेचा निवेदन देऊन निषेध करण्यात आला.

या निवेदनात माजी आमदार संतोष चौधरी यांना त्वरित अटक करून यापुढे अशा घटना घडणार नाहीत यासाठी शासनाने ठोस पावले उचलावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य नगरपरिषद संवर्ग अधिकारी संघटनेच्या वतीने यांनी निवेदनाद्वारे केली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News