अहमदनगर Live24 टीम, 19 जून 2021 :- राज्य सरकारचा गलथान कारभार सुरूच आहे. वारंवार आपल्या प्रलंबित मागण्या गाऱ्हाणे मांडून देखील सरकार अजिबात आशा कर्मचाऱ्यांची दखल घेत नसल्याचे चित्र आहे.
कोरोना काळात जीव धोक्यात घालून कामे करुनही गुलामांप्रमाणे वागणूक दिली जात आहे. यामुळे आशा आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तक यांनी आंदोलन पुकारले आहे.

नुकतेच आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तक यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी आमदार मोनिका राजळे यांच्या शेवगाव येथील निवासस्थानावर आशा व गट प्रवर्तकांनी भर पावसात मोर्चा काढला.
आशा व गट प्रवर्तकांनी आपल्या मागण्यांचे निवेदन आमदार राजळे यांना दिले. नेमक्या काय आहेत मागण्या? जाणून घ्या आशा व गटप्रवर्तक यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळावा.
आशा वर्कर यांना १८ हजार रुपये व गट प्रवर्तक यांना २१ हजार रुपये दरमहा वेतन देण्यात यावे. तसेच आशा व गट प्रवर्तक यांच्यावरील हल्ले थांबविण्यासाठी कडक योजना करून शासन करावे.
ज्या आशा व गट प्रवर्तक कोविड १९ मध्ये काम करताना कोविड बाधित झाल्याने त्यांचे वेतन निघाले नाही, त्यांचे वेतन देण्यात यावे.
दरम्यान या आयोजित मोर्चाचे नेतृत्व भाकपचे राज्यसहसचिव सुभाष लांडे , तालुकाध्यक्ष संजय नांगरे यांनी केले. मोर्चात सर्व आशा व गट प्रवर्तक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम