अहमदनगर Live24 टीम, 20 जून 2021 :- महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या बागेत मोकाट जनावरे सोडल्याने पिकांचे फळपिकांचे नुकसान झाले.
ते अधिक होऊ नये म्हणून ती मोकाट जनावरे पकडून ते कोंडवाड्यात घेऊन जात असताना बागेचा रखवालदारास मारहाण करण्यात आली.
शिवीगाळ केली गेली. जिवे मारण्याची धमकी देण्यात आली. सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा वरवंडी येथील चौघाजणांविरुद्ध नोंदवण्यात आला.
शनिवारी सायंकाळी पाच वाजता विद्यापीठ बागेत हा प्रकार घडला. सखाराम रामदास बरे, भोजराज बरे, नारायण भोजराज बरे, प्रदीप हरिभाऊ बरे,
सर्व वरवंडी यांच्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला. बागेचे अतिरीक्त देखभाल अधिकारी योगेश साहेबराव भिंगारदे यांनी याबाबतची फिर्याद दिली.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम