अहमदनगर Live24 टीम, 21 जून 2021 :- देशात गेल्या २४ तासांमध्ये ५८,५६२ नवे रुग्ण आढळले. मागील ८१ दिवसांत ६० हजारांहून कमी आढळलेला हा नीचांकी आकडा आहे.
तर दिवसभरात ८७,४९३ रुग्ण बरे झाले असून देशात सध्या ७ लाख २४ हजार एवढे ॲक्टिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने रविवारी दिली आहे.

दुसरीकडे, गत २४ तासांमध्ये १,५३७ रुग्णांचा कोरोनाने बळी गेला. याबरोबरच मृतांचा आकडा हा ३ लाख ८६ हजारांवर पोहोचला आहे.
मागील ६३ दिवसांतील हा सर्वात कमी आकडा आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांमध्ये ५८,५६२ नवे रुग्ण आढळल्याने देशातील एकूण कोरोना बाधितांची संख्या २ कोटी ९८ लाख ८१ हजार ९६५ झाली.
दिवसभरात १,५३७ रुग्णांचा मृत्यू झाल्याने कोरोना बळींचा एकूण आकडा ३ लाख ८६ हजार ७१३ झाला आहे. सध्या देशभरात ७ लाख २४ हजार लोक कोरोनावर उपचार घेत आहेत.
मागील चोवीस तासांत ८७,४९३ जणांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली. त्यामुळे आतापर्यंत बरे होणाऱ्यांची संख्या ही २ कोटी ८७ लाख ६६ हजार ९ एवढी झाली आहे.
देशात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे ९६.२७ टक्के एवढे आहे. तर मृत्यूदर १.२९ टक्के आहे. दरम्यान, देशात आतापर्यंत ३९ कोटी १० लाख १९ हजार ८३ जणांचे नमुने तपासण्यात आले. यापैकी १८ लाख ११ हजार ४४६ लोकांची चाचणी २४ तासांत करण्यात आली.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम













