अहमदनगर Live24 टीम, 22 जून 2021 :- शेवगाव मौजे पिंगेवाडी येथे वाळू तस्करी करत खोट्या दस्तऐवज च्या आधारे आभासी वाळू लिलाव चा कट रचणार्या तहसीलदार अर्चना पागिरे यांच्यावर गुन्हा दाखल करून शासकीय सेवेतून बडतर्फ करण्याची मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय येथील भूजल सर्वेक्षण कार्यालयाच्या आवारात अमरण उपोषण विशाल बलदवा यांनी केले आहे.
या वाळू लिलावाच्या संदर्भात आम्ही सर्व पुरावे देऊन देखील जिल्हा प्रशासनाकडून कारवाईस विलंब होत आहे व सामान्य व्यक्तींवर कठोर कारवाई करत तहसीलदार पदावरील अधिकाऱ्यांवर कोणत्याही प्रकारची कारवाई होत नाही यासंदर्भात वाळू निलाव च्या नकला मागितले असता तालुक्यातील झेरॉक्स मशीन बंद आहे
म्हणून मौजे पिंगेवाडी वाळू लिलावाच्या नकला मला देत येणार नाही १५ तारखेनंतर देण्याचे आश्वासन तहसीलदार यांनी दिले आहे तहसीलदारांनी यापूर्वी गेल्या ६ महिन्यात तीच कागदपत्रे माहिती कुठल्याही वरिष्ठ कार्यालयाला दिली नाही किंवा उपविभागीय अधिकारी पाथर्डी यांच्या चौकशी ला ३ वेळेस संधी देऊन ही गैरहजर राहिल्या.
तहसीलदार यांनी सुट्टीच्या दिवशी सायंकाळी ५ वाजता बेकायदेशीरपणे २४ ब्रास चे चलन काढून जणू लाखभर रुपयांचा तुकडा शासनाच्या तोंडात घालून केलेला अति गंभीर गुन्हा झाकण्याचा प्रयत्न केला आणि पिंगेवाडी येथील मोठ्या प्रमाणात असलेल्या वाळू साठ्याचे
फक्त २४ ब्रास वाळू दाखवून लिलाव झालेला नसताना फक्त तक्रारीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांच्यासह शासनाचे अन्न खाता महाराष्ट्र शासनाचे लाखो रुपयांचा महसूल बुडवत खोटे दस्तऐवज तयार करत अति गंभीर गुन्हा केला आहे
काही खोटे दस्तऐवज आमच्याकडे उपलब्ध झाली असून उपोषणस्थळी जिल्हा गौण खनिज अधिकारी यांना देणार आहोत अहमदनगर जिल्ह्यातील शासकीय मुखवटा घातलेला या सर्वात मोठ्या गौण खनिज तस्करांचा खरा चेहरा राज्य शासनापुढे येईल
व दिलेल्या उपोषण अर्जासोबत असलेल्या नकलेप्रमाणे तहसीलदार शेवगाव यांच्याकडून संबंधित खोटी कागदपत्रे माहिती हस्तगत करुन पागिरे यांनी मर्यादेपलीकडे केलेला अधिकाराचा दुरुपयोग करणे
वाळू तस्करी आणि खोटे दस्तऐवज यांच्या साह्याने आभासी लिलाव प्रक्रियेचा कट रचणे केलेल्या अतिगंभीर गुन्ह्याची शिक्षा म्हणून गुन्हा दाखल करत
शासकीय सेवेतून बडतर्फ करण्यात यावे या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय येथे अमरण उपोषण सुरू करण्यात आले असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम